घसा दुखणे(soar throat)
(Sore Throat) * पिकलेली केळी दिवसभर शक्य तेवढी खावी. * बाभळीच्या सालीच्या काढ्याने दिवसातून ३-४ वेळा गुळण्या कराव्यात. * २ कप दूध आटवून त्यात हळद पावडर व गूळ टाकून प्यावे. * गरम पाण्यात २ चमचे सुंठ पावडर टाकून कोमट झाल्यावर गाळून सकाळ-संध्याकाळ नियमित ३ दिवस प्यावे. * खैराचा काथ २ भाग, जायफळ, कापूर व चिकनी सुपारी प्रत्येकी १ भाग या सर्वांचे चूर्ण करून काथाच्या पाण्यात खलून त्याच्या गोळ्या करून ठेवाव्यात. १- १ गोळी दर ४ तासांनी चघळावी. या गोळीमुळे मुखरोग, जिभेचे रोग व दंतरोग निश्चित बरे होतात. * लिंबू रस चाटावा. * ३-४ मिरे बारीक वाटून, साजूक तुपात कालवून सकाळी अनशेपोटी नियमित ३ दिवस चाटावे. चाटण घेतल्यावर २ तास काहीच खाऊ नये. * छोटा चमचाभर आल्याचा रस, शुद्ध गुग्गुळ, मिरे पावडर, हळद, २ थेंब लवंग तेल व थोडा 'कापूर सर्व एकत्र वाटून त्याच्या ३ गोळ्या बनवाव्यात. सकाळी, दुपारी व रात्री १-१ गोळी घ्यावे. स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी