घशातल्या गाठींची सुज (Tonsillitis
घशातल्या गाठींची सुज (Tonsillitis)
- मध व पाणी समभाग घेऊन एकत्र करून दिवसातून ४ वेळा नियमित ४ दिवस गुळण्या कराव्यात.
* हळकुंड, सुंठ व लसूण पाण्यात आलटून पालटून उगाळून घशातल्या गाठींना बाहेरून लेप द्यावा.
* कोमट पाण्यात रुद्राक्ष उगाळून त्याचा घशाला बाहेरून लेप द्यावा. हा उपाय ३ दिवस करावा.
* लसणाचा रस व हिंग पावडर समभाग घेऊन घशाला रोज सकाळी व रात्री नियमित ३ दिवस लेप लावावा. * सैंधव मिठाची भरडपूड घशातील गाठींवर चोळावी.
* पांढऱ्या गोफणीचे बी मधात उगाळून घशातल्या गाठींना लावावे.
* आघाड्याची २ पाने व मुळी वाढून मऊ लगदा करावा.हे मिश्रण घशातील गाठींना आतून लावावे.
* सुके अंजीर थोड्या पाण्यात उकळून घशाच्या बाहेरून लेप लावावा.
* जांभळाच्या सालीच्या कोमट काढ्याने रोज सकाळ- संध्याकाळ गुळण्या कराव्या.
* टाकणखाराच्या लाहीचे चूर्ण मधात कालवून ते मिश्रण घशातील गाठींना लावावे. हा उपचार दिवसातून ३ वेळा ३ दिवस करावा.
* मुळयाचा १ कप रस व १० ग्रॅम मीठ एकत्र करून गरम करावे. गरम असतानाच त्याने गुळण्या कराव्यात
* २ ग्रॅम ओवा रात्री खावा व त्यावर गरम पाणी प्यावे. * * घशातील गाठींना हळद पावडर चोळावी.
थोडे वेगळे उपचार
* रुद्राक्षाची माळ गळ्यात घट्ट बसेल अशी घालावी. *
* गरम तव्यावर मोहरी टाकून त्याचा धूर घशात घ्यावा. * पिकलेल्या केळाची साल गळ्यावर बाहेरून बांधावी.
स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी
Comments
Post a Comment