आग तळहात ,तळपायांची
* लोणी चोळून लगेच शेकावे.
* १० ग्रॅम धणे व १० ग्रॅम जिरे एकत्र भरडून २५० ग्रॅम पाण्यात रात्रभर भिजत टाकून, त्याच पाण्यात कुस्करून, वस्त्रगाळ करून खडीसाखर टाकून रोज सकाळी नियमित ७ दिवस प्यावे.
* आमसुलाचे तेल गरम करून तळहात तळपायात जिरवावे.
* कांदा किसून तळहात, तळपायांना बांधावा.
* मसुर डाळ गरम करून, उकळून थंड केलेल्या पाण्यात वाटून तळहात, तळपायास त्याचा लेप द्यावा.
* मेंदीचा पाला वाटून, तळ हात-पायास लेप द्यावा.
* ३० ग्रॅम उतरणीचा पाला, ३० ग्रॅम तुळशीचा पाला व १० ग्रॅम दुर्वांची मुळी हे सर्व एकत्र वाटून, त्याचा रस काढावा. त्यातला २ चमचे रस प्यावा. उरलेल्या रसात भिजवलेले तांदुळ वाटून ३ ते ७ दिवस तळ हात-पायास लेप द्यावा.
* तुळशीचे चमचाभर बी रात्रभर कपभर पाण्यात भिजत टाकावे. सकाळी अनशेपोटी त्याच पाण्यात बी कुस्करून नियमित २१ दिवस प्यावे.
* तांदुळकाच्या भाजीच्या पावकप रसात साखर मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित ७ दिवस प्यावा.कुस्करून नियमित २१ दिवस ज्याप
* तांदुळकाच्या भाजीच्या पावकप रसात साखर मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित ७ दिवस
* चमचाभर आवळकंठी चूर्ण व एका वेलदोड्याच्या दाण्यांची पावडर एकत्र करून दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर नियमित ३ दिवस घ्यावे. * धणे पावडर १ चमचा प्रमाणात घेऊन, पाण्यासह रोज सकाळ-संध्याकाळ ७ दिवस घ्यावी.
* चमचाभर धणे थोडे भरडून कपभर पाण्यात भिजत टाकावे. थोड्या वेळाने ते धणे चावून खातांना थोडे थोडे पाणी प्यावे.
* शिंगाड्याच्या पिठाचा शिरा करून खावा.
* बर्फ न टाकता ऊसाचा रस प्यावा.
* एरंडतेल तळहात तळपाय व कानशिलांना चोळावे.
* एरंडाच्या पानास तूप किंवा लोणी लावून, तळपायांना रात्रभर बांधावे.
* पायाची जळजळ होत असल्यास - निर्गुडीची पाने
वाटून बांधावीत.
* हिरव्या कच्च्या पपईचा कीस शिजवून तळपायास रात्री बांधावा.
* रात्री झोपण्यापूर्वी टबात पाणी घेऊन त्यात अर्धातास पाय बुडवून बसावे.
थोडा वेगळा उपचार
* केळाची साल वाळवून जाळावी. राख वस्त्रगाळ करून
गायीच्या तुपात खलून मलम तयार करावा. हा मलम सकाळी व रात्री, तळहात-पायास नियमित ७ दिवस लावावा.
स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी
Comments
Post a Comment