आग दाह साठी आयुर्वेदिक उपचार
सर्वांगाची आग
(Peripheral Nearitis / Inflammation Irritation)
* कडूनिंबाचा मुठभर पाला ग्लासभर पाण्यात वाटून,
वस्त्रगाळ करून, खडीसाखर मिसळून सकाळ
संध्याकाळ ३ दिवस प्यावा.
* एरंडतेलाने सर्व शरीरास मॉलीश करावी.
* नारळाचे पाणी प्यावे.
*आमसुलाचे सरबत प्यावे.
* दाह होत असलेल्या जागेवर पाण्यात उगाळलेले चंदनाचे गंध लावावे.
* प्रवाळयुक्त गुलकंद २ चमचे या प्रमाणात दर ३ तासांनी घ्यावे. *
* दशांग लेपात गायीचे तूप मिसळून त्वचेवर लेप द्यावा.
* दुधामध्ये तीळ वाटून भयंकर दाह असलेल्या जागेवर
लेप लावावा
* कडकडीत कढवलेले तीळतेल थंड करून, आग होणाऱ्या जागी लावावे.
* चमचाभर धणे व तेवढीच खडीसाखर एकत्र करून, दिवसातून ४ वेळा नियमित ३ दिवस खावे..
* १० ग्रॅम धणे, १० ग्रॅम जिरे एकत्र भरडून रात्री २५० ग्रॅम पाण्यात भिजत टाकावे. सकाळी त्याच पाण्यात कुस्करून वस्त्रगाळ करावे. त्यात चवीसाठी खडीसाखर टाकून रोज सकाळी ७ दिवस नियमित प्यावे, पोटातील आग थांबत.
* १ चमचा आवळकंठीचे चूर्ण व एका वेलदोड्याच चूर्ण एकत्र करून, दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर नियमित ३ दिवस घ्यावे.
* ग्लासभर पाण्यात एका लिंबूचा रस मिसळून साखर टाकून प्यावे.
* २५ ग्रॅम किसमिस पाण्यात वाटून, वस्त्रगाळ करून,
दिवसातून ४ वेळा नियमित ३ दिवस प्याव
* बोराची कोवळी पाने चांगली वाटून, पाण्यात मिसळावी. हे पाणी खूप घुसळावे. भांड्यातल्या पाण्यावर फेस येतो. हा फेस आग होत असलेल्या जागेवर लावावा. हा प्रयोग दिवसातून ३ वेळा नियमित ३ दिवस करावा.
* ७ आमसुल चटणीसारखे बारीक वाटून, ग्लासभर पाण्यात मिसळावे. वस्त्रगाळ करून, साखर मिसळून सकाळ-संध्याकाळ नियमित ३ दिवस प्यावे.
थोडे वेगळे उपचार
३ दिवस प्यावे.
थोडे वेगळे उपचार
* कलिंगडाचा पांढरा भाग पाट्यावर वाटून त्यात थोडा कापूर व चंदन पावडर मिसळावी. चांगले एकजीव करून सर्व शरीरावर चोळावे. अंगाची लाही लाही थांबते.
* केळीची पाने जमिनीवर अंथरून त्यावर विवस्त्र अवस्थेत झोपावे.
* कमळाची पाने मिळाल्यास ती जमिनीवर अंथरून विवस्त्रावस्थेत पानांवर झोपावे.
स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी
Comments
Post a Comment