Posts

घसा दुखणे(soar throat)

 (Sore Throat)  * पिकलेली केळी दिवसभर शक्य तेवढी खावी. * बाभळीच्या सालीच्या काढ्याने दिवसातून ३-४ वेळा गुळण्या कराव्यात. * २ कप दूध आटवून त्यात हळद पावडर व गूळ टाकून प्यावे. * गरम पाण्यात २ चमचे सुंठ पावडर टाकून कोमट झाल्यावर गाळून सकाळ-संध्याकाळ नियमित ३ दिवस प्यावे. * खैराचा काथ २ भाग, जायफळ, कापूर व चिकनी सुपारी प्रत्येकी १ भाग या सर्वांचे चूर्ण करून काथाच्या पाण्यात खलून त्याच्या गोळ्या करून ठेवाव्यात. १- १ गोळी दर ४ तासांनी चघळावी. या गोळीमुळे मुखरोग, जिभेचे रोग व दंतरोग निश्चित बरे होतात. * लिंबू रस चाटावा. * ३-४ मिरे बारीक वाटून, साजूक तुपात कालवून सकाळी अनशेपोटी नियमित ३ दिवस चाटावे. चाटण घेतल्यावर २ तास काहीच खाऊ नये. * छोटा चमचाभर आल्याचा रस, शुद्ध गुग्गुळ, मिरे पावडर, हळद, २ थेंब लवंग तेल व थोडा 'कापूर सर्व एकत्र वाटून त्याच्या ३ गोळ्या बनवाव्यात. सकाळी, दुपारी व रात्री १-१ गोळी घ्यावे. स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी

घसा कोरडा पडणे

                     घसा कोरडा पडणे * बाभळीचा डिंक चघळावा. * आवळे व द्राक्षे समप्रमाणात घेऊन वाटून त्यात आवश्यक तेवढे गायीचे तूप मिसळून त्याच्या गोळ्या बनवाव्यात व चघळाव्यात. * सफरचंदाचा रस व पाणी प्रत्येकी ३० ग्रॅम एकत्र करून सकाळ संध्यकाळ घेणे.

घशातल्या गाठींची सुज (Tonsillitis

             घशातल्या गाठींची सुज (Tonsillitis) - मध व पाणी समभाग घेऊन एकत्र करून दिवसातून ४ वेळा नियमित ४ दिवस गुळण्या कराव्यात. * हळकुंड, सुंठ व लसूण पाण्यात आलटून पालटून उगाळून घशातल्या गाठींना बाहेरून लेप द्यावा. * कोमट पाण्यात रुद्राक्ष उगाळून त्याचा घशाला बाहेरून लेप द्यावा. हा उपाय ३ दिवस करावा. * लसणाचा रस व हिंग पावडर समभाग घेऊन घशाला रोज सकाळी व रात्री नियमित ३ दिवस लेप लावावा. * सैंधव मिठाची भरडपूड घशातील गाठींवर चोळावी. * पांढऱ्या गोफणीचे बी मधात उगाळून घशातल्या गाठींना लावावे. * आघाड्याची २ पाने व मुळी वाढून मऊ लगदा करावा.हे मिश्रण घशातील गाठींना आतून लावावे.  * सुके अंजीर थोड्या पाण्यात उकळून घशाच्या बाहेरून लेप लावावा. * जांभळाच्या सालीच्या कोमट काढ्याने रोज सकाळ- संध्याकाळ गुळण्या कराव्या. * टाकणखाराच्या लाहीचे चूर्ण मधात कालवून ते मिश्रण घशातील गाठींना लावावे. हा उपचार दिवसातून ३ वेळा ३ दिवस करावा. * मुळयाचा १ कप रस व १० ग्रॅम मीठ एकत्र करून गरम करावे. गरम असतानाच त्याने गुळण्या कराव्यात * २ ग्रॅम ओवा रात्री खावा व त्यावर गरम पाणी...

घशाची खव खव, जळ जळ,घश्यात पुरळ

 घशाची खवखव कापूर-काचरी चघळावी. आंब्याची वाळलेली पाने जाळून त्याचा धूर घशात घ्यावा. घशाची जळजळ =पांढरा कांदा किसून अर्धवट दह्यात कालवावा. त्यात आवश्यक तेवढी पिठीसाखर मिसळून रोज सकाळ- संध्याकाळ काही दिवस खावे. * ज्येष्ठमध पावडर व १० मनुके एकत्र उकळून, गाळून रोज सकाळ संध्याकाळ नियमित ३ दिवस प्यावे. * पालकाच्या पानांच्या रसाने गुळण्या कराव्यात. घशात पुरळ * कवठाच्या गरात गूळ मिसळून दिवसातून ३-४ वेळा खावे. * बाभळीची पाने वाटून त्याची गोळी करावी व ती चघळावी. * कपभर पाण्यात चमचाभर मध एकजीव करून गुळण्य कराव्यात. स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी

घटसर्प (DIPHTHERIA)

 घटसर्प (Diphtheria) (तिखट-तळलेले-मसालेदार पदार्थ महिनाभर खाऊ नये.) * ओव्याचे फुल ग्लासभर पाण्यात विरघळवून त्यात मध मिसळून एकजीव करून वस्त्रगाळ करून घ्यावे. (लहान बालकास १-१ थेंब या प्रमाणात द्यावे.) * कंकोळ (शीतळचिनी), चंदन, साखर प्रत्येकी १ ग्रॅम एकत्र करून दिवसातून ४ वेळा खावे. * तांदुळका व हळद पावडर यांचा पावकप कोमट काढा दिवसातून ३ वेळा नियमित ३ दिवस प्यावा. * पाथरीच्या भाजीच्या ३ चमचे रसात मिऱ्यांचे चूर्ण मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित ३ दिवस प्यावे. * आंब्याच्या पानांचा रस किंवा आंब्याच्या सालीचा काढा घशातल्या फोडांवर बाहेरून लावावा. * जवखार, पिंपळी व डाळींबाचे दाणे वाटून गोळी चघळावी. * अननसाचा रस सकाळ-संध्याकाळ प्यावा. * ३-४ मिरे तुपात वाटून रोज सकाळी अनशेपोटी नियमित ३ दिवस घ्यावे.                थोडे वेगळे उपचार * पपईचा ताजा किंवा वाळलेला चिक पावकप पाण्यात एकजीव करून घशाला आतुन लावा * शेवया उकळलेले गरम पाणी कोमट करून प्यावे * रिठ्याच्या सालीचे चमचाभर चूर्ण कपभर पाण्यात चांगले घोटून १-१ चमचा घ्या. स्रोत: श्री स्वामी समर्थ केंद्र दिंड...

आग तळहात ,तळपायांची

* लोणी चोळून लगेच शेकावे. * १० ग्रॅम धणे व १० ग्रॅम जिरे एकत्र भरडून २५० ग्रॅम पाण्यात रात्रभर भिजत टाकून, त्याच पाण्यात कुस्करून, वस्त्रगाळ करून खडीसाखर टाकून रोज सकाळी नियमित ७ दिवस प्यावे. * आमसुलाचे तेल गरम करून तळहात तळपायात जिरवावे. * कांदा किसून तळहात, तळपायांना बांधावा. * मसुर डाळ गरम करून, उकळून थंड केलेल्या पाण्यात वाटून तळहात, तळपायास त्याचा लेप द्यावा. * मेंदीचा पाला वाटून, तळ हात-पायास लेप द्यावा. * ३० ग्रॅम उतरणीचा पाला, ३० ग्रॅम तुळशीचा पाला व १० ग्रॅम दुर्वांची मुळी हे सर्व एकत्र वाटून, त्याचा रस काढावा. त्यातला २ चमचे रस प्यावा. उरलेल्या रसात भिजवलेले तांदुळ वाटून ३ ते ७ दिवस तळ हात-पायास लेप द्यावा. * तुळशीचे चमचाभर बी रात्रभर कपभर पाण्यात भिजत टाकावे. सकाळी अनशेपोटी त्याच पाण्यात बी कुस्करून नियमित २१ दिवस प्यावे. * तांदुळकाच्या भाजीच्या पावकप रसात साखर मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित ७ दिवस प्यावा.कुस्करून नियमित २१ दिवस ज्याप * तांदुळकाच्या भाजीच्या पावकप रसात साखर मिसळून रोज सकाळ-संध्याकाळ नियमित ७ दिवस * चमचाभर आवळकंठी चूर्ण व एका वेलदोड्याच्या दाण्यांची पावडर ए...

आग दाह साठी आयुर्वेदिक उपचार

  सर्वांगाची आग (Peripheral Nearitis / Inflammation Irritation) * कडूनिंबाचा मुठभर पाला ग्लासभर पाण्यात वाटून, वस्त्रगाळ करून, खडीसाखर मिसळून सकाळ  संध्याकाळ ३ दिवस प्यावा. * एरंडतेलाने सर्व शरीरास मॉलीश करावी. * नारळाचे पाणी प्यावे. *आमसुलाचे सरबत प्यावे. * दाह होत असलेल्या जागेवर पाण्यात उगाळलेले चंदनाचे गंध लावावे. * प्रवाळयुक्त गुलकंद २ चमचे या प्रमाणात दर ३ तासांनी घ्यावे. * * दशांग लेपात गायीचे तूप मिसळून त्वचेवर लेप द्यावा. * दुधामध्ये तीळ वाटून भयंकर दाह असलेल्या जागेवर लेप लावावा * कडकडीत कढवलेले तीळतेल थंड करून, आग होणाऱ्या जागी लावावे. * चमचाभर धणे व तेवढीच खडीसाखर एकत्र करून, दिवसातून ४ वेळा नियमित ३ दिवस खावे.. * १० ग्रॅम धणे, १० ग्रॅम जिरे एकत्र भरडून रात्री २५० ग्रॅम पाण्यात भिजत टाकावे. सकाळी त्याच पाण्यात कुस्करून वस्त्रगाळ करावे. त्यात चवीसाठी खडीसाखर टाकून रोज सकाळी ७ दिवस नियमित प्यावे, पोटातील आग थांबत. * १ चमचा आवळकंठीचे चूर्ण व एका वेलदोड्याच चूर्ण एकत्र करून, दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर नियमित ३ दिवस घ्यावे. * ग्लासभर पाण्यात एका लिंबूचा रस मिसळून साखर ...